45+ Best Marathi Poem-Kavita

Here is the best Marathi Poem of different categories. The Marathi poem is categorized accordingly. So please read it and share it with your friends. The Marathi poem is a way of expressing the feeling of great Maharashtrian Culture.

In this article (Marathi Poem), there are different kinds of poems such as Love poems, poems of famous poet Kusumagraj, and some other famous poems.

Marathi Poem of different categories

मराठी कविता (Marathi Poem) ही मराठी भाषेत लिहिलेली कविता आहे. मराठी ही भारताच्या अधिकृत भाषांपैकी एक आहे.
या लेखात (Marathi Poem), प्रेम कविता, प्रसिद्ध कवी कुसुमाग्रजांच्या कविता आणि इतर काही प्रसिद्ध कविता अशा वेगळ्या
प्रकारच्या कविता आहेत.

Marathi Poem: प्रेम कविता

1. आवडत मला पावसात

आवडत मला पावसात

चिम्ब चिम्ब भिजण.

अनुभवते मी बीजा च

अन्कुरन्यासाठी रुजन.


2. कोवळ्या उन्हात न्हाऊन

कोवळ्या उन्हात न्हाऊन

नखशिखांत तु नटलेली,

जणु, सोज्वळ ती फुलराणी

ओली आताच फुललेली.


3. तुझे काय ते तुला माहित

तुझे काय ते तुला माहित

प्रेम माझे खरे होते

तुला ओळखता नाही आले

मी तर सर्वस्व तुला वाहिले होते


4. दिवसागन श्वास नविन

दिवसागन श्वास नविन

श्वासागन भास नविन

पण तुझ होकारानेच सुरु होइल

माझ्या आयुष्याचा प्रवास नविन !!!


5. मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं

मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,

पण तरी ते तुलाच शोधत होतं,

तुला खरच ओळखता नाही आलं,

ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.


6. मनातले सारे तिला सांगण्याचे

मनातले सारे तिला सांगण्याचे

मी नेहमीच ठरवत होतो

समोर ति आल्यावर मात्र

नेहमीच मी घाबरलो होतो


7. आठवणीतला पाऊस नेमका

 आठवणीतला पाऊस नेमका,

तुझ्या घरापाशी बरसतो,

माझा वेडा चातक पक्षी इथे,

एका थेंबासाठी तरसतो


8.  तिची तक्रार आहे कि

तिची तक्रार आहे कि,

मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो

कस सांगू तिला कि,

♥ प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो


9. अनमोल जीवनात

अनमोल जीवनात,

साथ तुझी हवी आहे,

सोबतीला अखेर पर्यंत

हाथ तुझा हवा आहे,

आली गेली कितीही

संकटे तरीही,

न डगमगणारा

विश्वास फक्त तुझा हवा आहे…


10. अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात

अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,

खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,

मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,

अशानांच लोक "सभ्य" म्हणुन ओळखतात..


11. अस कधीतरी घडाव

अस कधीतरी घडाव ,

कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव...

तिने हळूच माझ्याकडे बघाव ,

मी बघतांना तिने हळूच लाजाव... .

भर पावसात मग तिच्यासोबत ओलचिंब व्हाव ,

भर पावसात अलगद तिला मिठीत घ्याव...

मी दिसताच तिने मग हळूचहसाव,

आणि मी नसतांना तिने रडाव ...

तिला चीडवल्यावर तिने मुद्दाम रुसाव ,

मग तिला मनवन्यासाठी तिला सुंदर गुलाबाच फुलद्याव... .

तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला माझच नाव

निघाव ,स्वप्नातही तिला मीच दिसावं....

अस कधीतरी घडाव ,

कुणीतरी नक्कीच माझ्यावर प्रेम कराव...♥


12. असं फक्त प्रेम असंत

असं फक्त प्रेम असंत

त्याला हृदयातचं जपायचं

असतं प्रेमात अधिकार असतो

पण गाजवायचा नसतो प्रेमात

गुलाम असतो …

पण राबवायचा नसतो

प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं पण स्वतःला स्वातंत्र्य नसतं

नेहमीच एकट्याचं

असतं पण दुसऱ्याशिवाय

शक्य नसतं कळत नकळत

कसं होतं ते मात्र कधीच

कळत नसतं…

असं फक्त प्रेमच असतं


13. असंच तू माझ्या डोळ्यांतं पाहावं  आणि मी तुझ्या अस़चं

असंच तू माझ्या डोळ्यांतं पाहावं  आणि मी तुझ्या अस़चं

तू माझ्या डोळ्यांत पाहावं आणि मी तुझ्या पाहत पाहत

दोघांनी आंधळं व्हावं,

कारण प्रेम हे अंधळच असतं म्हणतात !

कसं सांगू तुला किती जड झालंय जगायला एकेक महिना

तुझा चेहरा नाही मिळत बघायला.


14. असायला हवी अशी एखादी तरी

असायला हवी अशी एखादी तरी .

जिच्यात मी हरवून जावे .......!

रागावले जरी तिला कोणीही

घाव माझ्या हृदयात व्हावे

... इजा झाली माझ्या अंगी तर आईग

.... तिने म्हणावे .......!

असायला हवी अशी एखादी तरी .

जिच्यात मी हरवून जावे .......!


15) असे असावे प्रेम

असे असावे प्रेम

केवळ शब्दानेच नव्हे

तर नजरेने समजणारे…

असे असावे प्रेम

केवळ सावलीतच नव्हे

उन्हात साथ देणारे…

असे असावे प्रेम

केवळ सुखातच नव्हे

तर दु:खातही साथ देणारे…

Marathi Poem: कुसुमाग्रज

१. अनंत

एकदा ऐकले काहींसें असें

असीम अनंत विश्वाचे रण

त्यात हा पृथ्वीचा इवला कण

त्यांतला आशिया भारत त्यांत

छोट्याशा शहरीं छोट्या घरांत

घेऊन आडोसा कोणी 'मी' वसें

क्षुद्रता अहो ही अफाट असें!

भिंतीच्या त्रिकोनी जळ्मट जाळी

बांधून राहती कीटक कोळी

तैशीच सारी ही संसाररीती

आणिक तरीही अहंता किती?

परंतु वाटलें खरें का सारें?

क्षुद्र या देहांत जाणीव आहे

जिच्यात जगाची राणीव राहे!

कांचेच्या गोलांत बारीक तात

ओतीत रात्रीत प्रकाशधारा

तशीच माझ्या या दिव्याची वात

पाहते दूरच्या अपारतेंत!

अथवा नुरलें वेगळेंपण

अनंत काही जेंत्याचाच कण!

डोंगरदऱ्यांत वाऱ्याची गाणीं

आकाशगंगेत ताऱ्यांचे पाणीं

वसंतवैभव उदार वर्षा

लतांचा फुलोरा

केशरी उषा....प्रेरणा यांतून सृष्टीत स्फुरे

जीवन तेज जें अंतरी झरे

त्यानेच माझिया करी हो दान

गणावे कसे हें क्षुद्र वा सान?


२. स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या

स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या, राजस राजकुमारा

अपार माझ्या काळोखाला दिलास जीवनतारा

सुंदर आता झाली धरती, सुंदर नभ हे वरती

वैराणावर उधळीत आला श्रावण सुंदर मोती

मनात माझ्या मोरपीसांचा फुलला रंग पिसारा

रात्र एक मी अथांग होते नव्हता दीप उशाला

जागही नव्हती, नीजही नव्हती, नव्हता अर्थ कशाला

हारपलेल्या या नौकेला गवसे आज किनारा


३. कोलंबसचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनिने त्या

समुद्रा, डळमळू दे तारे !

विराट वादळ हेलकावूदे पर्वत पाण्याचे

ढळुदे दिशाकोन सारे!

ताम्रसुरा प्राशुन मातुदे दैत्य नभामधले

दडुद्या पाताळी सविता

आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला

करायला पाजुळुदे पलीता !

की स्वर्गातुन कोसळलेला, सुड समाधान

मिळाया प्रमत्त सैतान

जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती

करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भिषण नर्तन असेच चालु दे

फुटू दे नभ माथ्यावरती

आणि, तुटु दे अखंड ऊल्का वर्षावत अग्नी

नाविका ना कुठली भिती

सहकाऱ्यानो, का हि खंत जन्म खलाशांचा

झूंजण्या अखंड संग्राम

नक्षत्रापरी असीम नभामध्ये संचरावे

दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारू लोटले परताया मागे

असे का हा आपुला बाणा

त्याहुनी घेऊ जळी समाधि, सुखे कशासाठी

जपावे पराभुत प्राणा?

कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अन मरती

जशी ती गवताची पाती

नाविक आम्ही परंतु फ़िरतो सात नभांखाली

निर्मीतो नव क्षितिजे पूढती !

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन, ना दारा

घराची वा वितभर कारा

मानवतेचे निशाण मिरवू महासागरात

जिंकुनी खंड खंड सारा!

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती

कथा या खुळ्या सागराला

"अनंत अमुची ध्येयसक्ती अनंत अन आशा

किनारा तुला पामराला”


४. माझे जगणे होते गाणे

जाता जाता गाईन मी

गाता गाता जाईन मी

गेल्यावरही या गगनातील

गीतांमधुनी राहीन मी

माझे जगणे होते गाणे

कधी मनाचे कधी जनाचे

कधी घनाशय कधी निराशय

केवळ नाद तराणे

आलापींची संथ सुरावळ

वा रागांचा संकर गोंधळ

कधी आर्तता काळजातली

केव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन

कधी स्मशानामधले क्रंदन

अजणातेचे अरण्य केव्हा

केव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही

खेद खंत ना उरले काही

अदृष्यातील आदेशांचे

ओझे फक्त वाहणे


५. डाव

तिन्ही सांजच्या धुक्यात

किती कळशी घेऊन

कुंकाउ कापली भरून

 गेलीस तू

वाट पाहून माझे

शेवाळलेले डोळे

पाय भयभीत वाले नदीकडे

तेथे काळे तुझा डाव

घाट पदे घाटावर

रेषा कुंकवाच्या चार पाण्यावरी


६.  तिमिरातुनी तेजाकडे

तिमिरातुनी तेजाकडे...

तिमिरातुनी तेजाकडे

ने दीपदेवा जीवना ॥

ज्योतीपरी शिवमंदिरी

रे जागवी माझ्या मना ॥

दे मुक्तता, भयहीनता

अभिमान दे, दे लीनता

दे अंतरा शुभदायिनी

मलयनिलासम भावना ॥


७. प्रेम कर भिल्लासारखं कवी

पुरे झाले चंद्र-सुर्य, पुरे झाल्या तारा,

पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा

मोरासारखा छाती काढून उभा राहा,

जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा

सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा.

शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?

डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय?

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,

जास्तीत-जास्त बारा महिने बाई बसेल झुरत

नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ,

प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं,

प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,

मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं

शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस,

बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं,

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं!


८. माझे जीवनगाणे

माझे जगणे होते गाणे

सुरेल केंव्हा, केंव्हा बेसुर

तालावाचून वा तालावर

कधी तानांची उनाड दंगल

झाले सुर दिवाणे

कधी मनाचे कधी जनाचे

कधी धनास्तव कधी बनाचे

कधी घनाशय कधी निराशय

केवळ नादतराणे

आलापींची संथ सुरावळ

वा रागांचा संकर गोंधळ

कधी आर्तता काळजातली

केंव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन

कधी स्मशानामधले क्रन्दन

अजाणतेचे अरण्य केंव्हा

केंव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही

खेद खंत ना उरली काही

अदॄश्यातिल आदेशांचे

ओझे फक्त वाहणे

सुत्रावाचून सरली मैफल

दिवेही विझले सभागॄहातिल

कशास होती आणि कुणास्तव

तो जगदीश्वर जाणे


९. अजूनही

अजूनही

निळया जांभळ्या नदीला

आंबेवनाची सावली

भेट पहिलीवहिली

अकल्पित

... भेट दुरस्थपणाची

गर्भरेशमी क्षणाची

सौदामिनीच्या बाणाची

देवघेव.

गुलबक्षीच्या फुलानी

गजबजले कुपण

वेचू लागला श्रावण

मोरपिसे।

ओल्या आभाळाच्या खाली

इद्रचापाचे तुकडे

तुझा करपाश पडे

जीवनास.

कधी रेताडीचे रस्ते

कधी मोहरली बाग

कधी प्रासादास आग

कर्पुराच्या।

सप्तसुरातुनी गेले

माझ्या जीवनाचे गीत

तुझ्या सारगीची तात

साथ झाली.

बर्फवाट शिशिराची

आता पुढलिया देशी

तुझ्या मिठीची असोशी

अजूनही.


१०. निरोप

गर्दीत बाणासम ती घुसोनि

चाले, ऊरेना लव देहभान

दोन्ही करांनी कवटाळूनीया

वक्ष:स्थळी बालक ते लहान

लज्जा न, संकोच नसे, न भीती

हो दहन ते स्त्रीपण संगरात

आता ऊरे जीवनसूत्र एक

गुंतोनी राहे मन मात्र त्यात

बाजार येथे जमला बळींचा

तेथेही जागा धनिकांस आधी

आधार अश्रूसही दौलतीचा

दारिद्र्य दु:खा दुसरी उपाधी

चिंध्या शरीरावरी सावरोनी

राहे जमावात जरा उभी ती

कोणी पहावे अथवा पुसावे?

एकाच शापातून सर्व जाती

निर्धार केला कसला मानसी

झेपाउनी ये ठिणगीप्रमाणे

फेकूनिया बाळ दिले विमाने

व्हावे पुढे काय प्रभूच जाणे

"जा बाळा जा, वणव्यातुनी या

पृथ्वीच आई पुढती तुझी रे

आकाश घेईं तुजला कवेंत

दाही दिशांचा तुज आसरा रे"

ठावे न कोठे मग काय झाले

गेले जळोनीं मन मानवाचे

मांगल्य सारे पडले धुळीत

चोहीकडे नर्तन हिंस्त्रतेचे!

Marathi Poem: काही प्रसिद्ध कविता

१. आई

कुणीच नाही माझे ..आई

 करूणेचे तळहात पोरके ..आई

आकांत श्वासांत , शांतता कुजबुज टाळे माझे ..आई

ना शुन्य आसपास, काळोख मावळे माझे ..आई

असे जवळ - तसे दूर भाबडे अंतराळ माझे ..आई

कुणीच नाही माझे ..आई

 करूणेचे तळहात पोरके ..आई

असेल - आहे - असणार, कुणी शब्द गाळले ..आई

अपराध असा परमेशाचा, का? तेज लोपती माझे ..आई

अभेद्य चौकट अश्रुंची, चित्र पुराणे माझे ..आई

कुणीच नाही माझे ..आई

करूणेचे तळहात पोरके ..आई


२. एका आईची अंतयात्रा

आता सर्व काही आठवेल तुला

अगदी सर्व सर्व.

कदाचित रडशीलही

प्रेक्षकांच्या आग्रहास्तव..

तूला जन्म दिला होता

याची परतफेड करशील.

मान खाली घालशील

शरमेने.

खांद्यावर घेशील तेव्हा

तहान शमेल मस्तकातली.

किणार्‍यावर पोहोचवशील

पाचव्या ईसमाच्या मदतीने..

हे करतांना क्षणभर का होईनात

पण...

आठवेल का रे तुला

माझा खांदा..?

घामांच्या धारांतून वाहणारा माझाच अंश

तुझ्या डोळ्यांतील भावनेला कवटाळेल

नकळत...

तेव्हा तरी संवेदनांची जाणीव होईल का रे

तुला..?

सर्व काही रितसर पार पाडशील

उघडा-नागडा माझा देह, उकळून घेशील भाजण्याआधी..

जाळशील आणि जळशील

देखावा सजवशील, अखेरचा...

माझा आणि तुझाही

माझा आणि तुझाही


३. माझं दैवत घरात

माझं दैवत उभं

माझ्याच घरात,

आयुष्यभरासाठी

'आशीर्वाद' देण्यास.

माझ्या मना

काहीच कळेना,

विसर मनाला

लागलो वारीला.

वारी-वारी करून

झालो मी बारीक,

खर्चुनी घरचं धन

लागली मनास सल.

सुखाच्या मी शोधात

कपाळी बुक्का लावत

माझं दैवत घरात

मी निघालो वारीत.

देहू-आळंदी झाले

पंढरी झाली-काशीलाही गेलो

मिसळलो मी वारीत

गुलाल खोबरे उधळत.

उशिराने कळुनी

चुकले मनास

'वैभवाचं मंदिर'

त्यावर कळस.

'तुळशीसम' प्रसन्न

सगळीकडं सहभाग,

सुखदुखात सोबत

"मना हिरवं रोपटं".

आली दाटुनी

नयनी आसवे,

मन माझे

पोरके झाले.

होतं घरीच दैवत

मी निघत वारीत,

मी निघत वारीत

माझं दैवत घरात.


४. माणूस म्हणून

चल माणसा भाकीत कर

मन तुझं उघड कर

जगण्याचा प्रवाह शिथिल कर

सुकर कर सुजय कर

ज्ञान लेऊन सज्ज हो

शास्त्र घेउन कर्ता हो

जीव-जीवाशी हर्ष कर

धर्म होऊन शासन कर

साद देऊन प्रतिसाद हो

आवाज ऐकून भाषा हो

मना-मनाला साथ कर

प्रयत्न तुझे सुफळ कर

सुकर्म करून वंद्य हो

हात देऊन मित्र हो

क्षणा-क्षणाला लक्ष्य कर

कर्तृत्वाला तुझ्या अजिंक्य कर

वर्तमानातून भविष्य हो

सावली देऊन दिशा हो

कणा-कणाला स्पर्श कर

माणूस म्हणून राज्य कर


५. ध्यास

जरी मी संपलो इथे

प्रवास संपणार नाही

चार लाकडांसोबत

माझा ध्यास जळणार नाही

राख निजेल मातीच्या कुशीत

स्वप्ने निजणार नाही

राहतील रेंगाळत येथेच

पण सावली दिसणार नाही

अगणित आकांशा

क्षणात संपत नसतात

पेटतात मंद चांदण्यांसारख्या

पेटतात तेजस्वी ताऱ्यांसारख्या

मावळतील दिवे

अंधार पसरेल चहुबाजू

सायंकाळ येईल

काळे वस्त्रे परिधान करून

त्याच क्षणी

सूर्य उगवलेला असेलच कोठेतरी

 त्याची आग विझणार नाही

विझलेली मशाल

पुन्हा पेटवतील

असंतोषाचे हात

होईल सुरु

एक नवा प्रवास

तीच वाट धरून

पोहोचेल तो

परिवर्तनाच्या क्षितिजावर

तोपर्यंत त्याची पापणी

तुफानातही लवणार नाही


६. पाऊस गातो गाणे

टिप टिप पाऊस

झो झो वारा

गीत गाऊ पाहतो

आसमंत सारा

कडाडणारी वीज

गडगडणारे ढग

धावण्यार्‍या छत्रीतली

आपली लगबग

डराव्‌ डराव्‌ बेडकं

छम छम तळे

लेझीम हाती घेऊनी जणू

थेंब लाटेवर पळे

खळ खळ झरा

तड तड पत्रा

पावसाने भरवली बघा

ताला सुरांची जत्रा


७. गणपतीचा आशीर्वाद - मोदक स्पेशल

नेवेद्यासाठी आईने

खोबरे घेतले खोवायला

समोरच्या आमराईने

दिले तोरण दाराला

आजच्या खोबर्‍यामध्ये असे

काय होते खास?

 प्रसाद म्हणुन मिळणार होता

गोड मोदकाचा घास

हळूहळू वितळू लागला

गूळ खोबर्‍या भोवती

निरांजनात मिठी मारून

 बसल्या होत्या वाती

श्वेत मुलायम समईमध्ये

भरले मोदकाचे सारण

धावणार्‍या नात्यांना लाभले

भेतावयाचे कारण

अनोख्या शब्दांच्या आरत्या

पितळी झांजांची त्यांना साथ

गुणगान ऐकूनी प्रिय पुत्राचे

प्रसन्न झाले भोलेनाथ

दुर्वांकूर व जास्वंद

झाल्या मस्तकी विराजमान

पंचपक्वानांनी नटले

सुगरास केळीचे पान

मुखी जेव्हा विरघळतो माझ्या

मोदकाचा हा प्रसाद

आभार त्या गणरायाचे

दिधला मोदकरूपी आशीर्वाद


८. स्वतंत्रता दिवस

घडतोय बदल

चढतेय वीटेवर वीट

मिटतेय गुलामी

आपण होतोय धीट

उठत आहेत प्रश्न

कुरवाळतोय शंका

अन्यायाविरुद्ध

कुणी वाजवतोय डंका

पसरतेय महिती

हक्कासाठी भांडतोय

उलट सुलट का होईनात

आपण विचार मांडतोय

घडवितोय देश आपला

अंतराळी इतिहास

उद्याच्या चैतन्यावर

दृढ होतोय विश्वास

कोपर्‍यातल्या झोपडीमध्ये

प्रगतीची इच्छा दिसतेय

पुस्तकाच्या बाजारातही

आशेची पालवी रुजतेय

भारतीय असण्याचा वाटे

मनापासून अभिमान

बलाढ्य सुंदर समृद्ध स्वतंत्र

माझा भारत देश महान


९. महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा

अभिमान माझा स्वाभिमान माझा

मराठी आमुची भाषा

मस्तकी देश प्रेमाची रेषा

सह्याद्रीच्या डोंगर रांगा

तलवारीची धार आमुच्या अंगा

पराक्रमांची ही भूमी

शूरविरांची नाही इथे कमी

शिवबाचा इतिहास सांगतो वारा

चमकतो संभाजीसारखा सूर्यतारा

ऐकतो तुकारामाची गाथा

टेकतो पंढरपुरी माथा

जाती धर्म जरी अनेक

तरी राहतो आम्ही एक


१०. माझी सखी

एक दिवस अचानक भेटली अनामिक सखी

फेकून गेली तोंडावर हसू मोरपंखी

हजार प्रश्न डोळ्यात घेऊन समोर आली

उंबरठ्यावर माझ्या क्षणिक येऊन विसावली

बसतेस का अजून हिंदोळ्यावर विसरून देहभान?

अजून मोती सांडतात का तूझ्या शब्दातून छान?

ओल्या मातीचा वास अजून भारावतो का तूला?

जातेस का अजून धावत पहिल्या पावसात भिजायला?

अजून वही लिहितेस का भावलेल्या रचनांची?

का झाली होळी तूझ्या शुद्ध विचारांची?

अजून खुणावते का तूला क्षितीज आणि मृगजळ?

का सुरू झाली तुझ्या बहराची पानगळ?

अजून कधी आळवतेस का सप्तसूरांचा संध्याराग?

मिटलेल्या डोळ्यांमधे स्वप्नफुलांची केशरबाग

सांग सखे भेटशील का अशीच अधून मधून?

तूझ्यात मी अन्‌ माझ्यात तू अशाच जाऊ गुंतून


११. पाऊस

एकदा पावसाने तुला विचारले.

साधारण कधी येऊ?

तर तू म्हणालीस,

-इच्छा नसताना.

पावसात तू जितकी चिंब भिजायचीस

तितकीच माझ्याकडे येताना कोरडी.

मग तूच मला गोष्ट सांगितलीस,

आपण दोघं ज्या कागदी नावेवर बसलो होतो

ती उलटल्याचई.

नंतर पावसाचे आणि तुझे वैर झाले.

तो वेगळ्याच टापूत बरसू लाघला

आणि तू वेगळ्या

मी मधल्यामध्ये कोरड्या नदीसारखा

आतून झिरपू लागलो.

नंतर नंतर

पाऊस आलच नाही

कधी तरी येईन एवढंच म्हणाला आणि

बी रुजल्यानंतरचं वाट पाहणं

आपण दोघाणि स्वीकारलं

समजूतदारपणे.


१२. शब्द फुलांचे

आम्हाला असं कधीच वाटलं नव्हतं

बाजारपेठेतील आपण खरेदीची वस्तू व्हावं..

स्टेजवरल्या मान्यवरांच्या स्वागतासाठी प्रेमाचं प्रतिक व्हावं अन,

स्वागतानंतर, विरहामुळे वा आणि कशाने कचरा पेटीत जायचं नव्हतं

कुणाच्या केसात तर कुणाच्या दप्तरात जावून कोमेजायचं नव्हतं

हिवाळ्यात काही दवबिंदू शरीरभर आदळून घ्यायचे होते

आम्हालाही काही दिवस आनंदाने जागायचे होते

एकाच्या स्वागतासाठी दुसर्याच्या गळ्यावर घाव-

हाच का भूतलावरचा न्याय म्हणून विचारायचं होतं

स्वप्नात तुम्हाला भीती घालावी तर आमच्यामुळे अधिकच चेकाळणार

आम्हावर तुम्ही अखेरपर्यंत अत्याचार करणार पण,

 आम्हालाही काही दिवस आनंदाने जागायचे आहेत.

आम्ही स्वतः आमच्यातीलच काहीना चिरडलेलं पाहत होतो,

पण आम्हालाही इथे थांबायला फारच कमी वेळ होता.


१३. फुल

आयुष्य जरी एक दिवसाचे

काम त्याचे लाख मोलाचे

सुख दुःखात असतो सोबती

फुलांची ही थोर महती

घेवू शिकवण आपण फुलांकडून

सुख दुःख वाटू सर्व मिळून

आयुष्यात असेल आपल्याही सुगंध

दृढ होतील ॠणाणुबंध


१४. पाऊस आणि तुझी आठवण

चिंब भिजुन पावसात

मन जाऊन बसतं ढगात

मोहरतात साऱ्या भावना

आठवणींच्या कृष्ण-धवल जगात

विजांसोबत सुरु होतो

मग ढगांचा लपंडाव

आठवणींनी पुन्हा गजबजतो

माझ्या मनातील उजाड गांव

कधी साकारते इंद्रधनु

उन्हासवे ओल्या पावसात

आठवणींना मग येतो बहर

रंगांनी सजल्या दिवसात

ओंजळीत गर्द अळवाच्या

चमकतात थेंब तेजाचे

आठवणींच्या धुंद धुक्याला

नवकोंदण तव प्रेमाचे

कधी संतत धार पावसाची

कधी साथ तिस वादळाची

कधी फुले बाग आठवांची

कधी वाहे सरिता आसवांची

सागराचा उग्र अवतार

सोबतीस पर्जन्य वारा

आठवांच्या रोखण्या ऊधाणा

तोकडा मनीचा किनारा

दररोज घडे श्रावणात

मेळ ऊन पावसाचा

सोबतीस माझ्या सदैव

हा खेळ संचिताचा


१५. प्रेमाचं रोपट

    ती रोज मला भेटायची

    पाहताच मला थांबायची

    गोड गोड हसून

    मान घाली घालून जायची

    का ती हसत होती

    आज मला कळलं

    कारण प्रेमाचं रोपटं

    माझ्या काळजात उगवलं

    त्याच त्याच घटनांचा

    ऊत आला होता

    अचानक नजर भिडण्याचा

    मोहर आला होता

    का ती मुध्दाम भेटायची

    आज मला कळलं

    कारण प्रेमाचं रोपटं

    माझ्या काळजात उगवलं

    तिचा माझा तसा

    काही परिचय नव्हता

    पण हसण्यावर तिच्या

    माझा जीव आला होता

    नकळत प्रेमात रमलो

    तेव्हा मला कळलं

    कारण प्रेमाचं रोपटं

    माझ्या काळजात उगवलं


१६. प्रेम सगळीकडे आहे

    प्रेम सगळीकडे आहे, असावे तर फक्त मनाचे डोळे

    Engineering च्या मार्क मेमो कडे बघून झालेला बाबांचा संताप असो,

    आई ने गायलेले अंगाई गीत असो

    यात असते प्रेम...

    पाढे चुकल्या नंतर ताई ने दिलेला धपाटा असो,

    माझा उदास चेहरा बघून दादा ने विचारलेला प्रश्न “का रे lovestory मध्ये काही प्रोब्लेम ?”

    यातहि आहे प्रेम...

    तिने खाऊ घातलेली पुरण पोळी असो कि कटाची आमटी,

    आम्ही सोबत खालेले chocolates,

    यातही आमच्या मैत्री चे प्रेम आहे...

    तिच्या नावातच ‘प्रेम’ आणि माझ्या नावात ‘अनंत’,

    असे माझे हे ‘अनंत प्रेम’ तिच्यावर...

    याच प्रेमाने जीवनाला अर्थ दिला...

    याच प्रेमाने एक आत्मविश्वास दिला...

    कधीतरी पालवी फुटेल आणि या ‘अनंत प्रेमाचे’ एक फुल उमलेल,

    प्रेम सगळीकडे आहे ,असावे तर फक्त मनाचे डोळे


१७. आयुष्याचा भागीदार

    तिच्या दिशेने पावलं

    आपोआप माझी वळतात

    मलाही उमजेना अशा

    वाटेला भावना कळतात

    भव्यतेची ओढ मला

    स्वप्नं माझी साहसी

    झोका घेता आकाशी भिडे

    ती ही आहे धाडसी

    पुस्तकांचे ओझे माझे

    ती लिलया पेलेल का?

    झेप घेऊनी धडपडलो

    तर ती मला झेलेल का?

    नेम अचूक स्थैर्य तिच्या हाती

    तीक्ष्ण विचारांचे बाण

    सोसेल का तिच्या बुद्धीला

    माझ्या धनुष्याचा ताण

    खळाळते हास्य तिचे

    नम्रतेचा शृंगार

    तिच्या तेजस्वी डोळ्यात दिसे

    मला आयुष्याचा भागीदार


१८. न सापडलेलं प्रेम

    क्षणात एका टोचलेलं

    खोल दरीत पोहोचलेलं

    तिथेच डुंबत बसलेलं

    न बोलता रुसलेलं

    ओठात कधी मिटलेलं

    कागदास कधी भेटलेलं

    पापणीच्या आड हसलेलं

    मनात माझ्या वसलेलं

    उशीच्या कुशीत निजलेलं

    स्वप्नाळु जगात सजलेलं

    असून सुद्धा नसलेलं

    पण आरशात मात्र दिसलेलं

    न सापडलेलं प्रेम...


१९. स्पर्श

    तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला

    गालावरी तुझ्या का खुलवुन लाज गेला

    होता जरा शहारा, वेडा खुळा बहाना

    ओठांवरी तुझ्या का, चढवुन साज गेला

    संगीत शांत केले अंधार गात गेला

    बेहोश रम्य राती उधळून श्‍वास गेला

    भिजवुन अंग सारे विझवुन शब्द सारे

    रंगात आज तुजला, रंगुन भास गेला...

    तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला

    गालावरी तुझ्या का खुलवून लाज गेला..

    तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला

    गालावरी तुझ्या का खुलवुन लाज गेला


२०. डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम

    निर्मळ वाचा

    विज्ञान भक्ती

    अवकाशी प्रेरणा

    प्रेमळ व्यक्ती

    विलक्षण बुद्धी

    मार्मिक विचार

    हाती दानत

    मुखी आधार

    मृदु स्वभाव

    संवेदनशीलता

    देश प्रेमाशी

    एकनिष्ठता

    कठोर परिश्रम

    थोर नेतृत्व

    सखोल अभ्यास

    अद्वितीय कर्तुत्व

    नव्या पिढीशी

    विचार मंथन

    स्वप्नाळू डोळ्यांना

    अविरत समर्थन

    या जाज्वल्य पार्वाला

    भारताचा सलाम

    एक महान गुरु

    डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम


In this article, Marathi Poem, you have read some kind of great and famous poem which motivates you a lot and increases your interest in the Marathi Poem. That's the magic of Marathi Poem. Once you read Marathi Poem then you the go with the flow of kindness. Marathi poem teaches you a lot about nature, living beings, and relationships. That's the specialty of Marathi culture and Marathi Poem. The Marathi Poem is different in its way. Also, the simplicity and awesomeness come from the magical words of Marathi Poem.

Comments

Popular posts from this blog

100+ Best Marathi Attitude Status

100+ Best Marathi Suvichar (Marathi Thoughts)